रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे 40 आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समील झाले आहेत. त्यामुळे आधीच कमकुवत झालेली महाविकास आघाडी आता आणखीनच कमकुवत झाली आहे.
परिणामी आता महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ठाकरे गटाच्या एका बड्या खासदाराने तर उद्धव ठाकरे यांनी आता एकला चलो रेची भूमिका घ्यावी, असा सल्लाच दिला आहे.
त्यामुळे महाविकास आघाडी फुटणार काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच या खासदाराच्या विधानावरून ठाकरे गटातही सर्वकाही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे.
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना हा सल्ला दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. राज्यात शिवसेनेने एकला चलो रेची भूमिका घ्यायला पाहिजे. राज्यातील जनतेची तशी इच्छा आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
