मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून रविवारी (२ जुलै) रोजी अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर इतर ८ आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आज म्हणजे अवघ्या ४८ तासातच राज्यमंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. यावेळी कॅबिनेट आठ महत्त्वाचे निर्णय घेतले.
या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणाऱ्या पहिले वर्ष सुराज्याचे या पुस्तिकेचे आणि लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाचे आज प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हे’ झाले निर्णय :
१) राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन
२) मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती
३) दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता
४) नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार
५) सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ
६) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.
७) सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ
८) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.
