राष्ट्रवादीमध्ये सुरु झालेल्या पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे राजकीय वातावरण चांगलाच ढवळून निघालं आहे. अजित पवार यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेत विविध गोष्टींबाबत आपली भूमिका मांडली.
तुम्ही सुप्रिया सुळेंची हकालपट्टी करणार का ? असा सवाल विचारला असता अजित पवार म्हणाले,”आम्ही बेरजेचे राजकारण करतोय.. पक्ष वाढवतोय.. आम्ही हकालपट्टी करण्यासाठी बसलेलो नाही असं रोखठोक उत्तर यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल.
