सरकारी कर्मचारीही ५८ व्या वर्षी निवृत्त होतात, आयएएस, आयपीएस ६० व्या तर भाजपातही ७५ व्या वर्षी निवृत्त केले जाते मग आपण कुठेतरी थांबणार की नाही अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना थेट प्रश्न केला होता.
अजित पवारांच्या या विधानानंतर आज पत्रकारांनी छगन भुजबळ यांना २०२४ ला तुम्ही शेवटची निवडणूक लढवणार का असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी रोखठोक विधान केले.
छगन भुजबळ आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, वय झाल्यामुळेच मी प्रदेशाध्यक्षपद यावेळी स्वीकारले नाही. १९९९ मध्ये शरद पवारांनी मला प्रदेशाध्यक्ष केले, ४ महिने राहिलो. आताही प्रदेशाध्यक्ष म्हणून खूप कामे असतात. पक्षसंघटनेसाठी फिरावे लागते.
बाकी इतर मंत्र्यांना कामे असतात जिथे बोलावले जाते तिथे जायचे. मी शरद पवारांसोबत असताना प्रमुख वक्ता म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जात होतो. आमचे काम करत होतो. यापुढेही अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांनी सांगितले भुजबळ तुम्ही थांबा, तर मी थांबेन असं त्यांनी सांगितले.
