पुणे आणि पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरात मागील काही दिवस पाऊस सुरु आहे. शहरात फार पाऊस नसून घाटमाध्यावर आणि लोणावळ्याच्या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे आणि पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात 8 आणि 9 जुलै रोजी ‘घाट परिसरातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुण्यात सोमवारपासून (10 जुलै) पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात 9 आणि 10 जुलै रोजी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
