संगमनेर(DSNews24/किरण पुरी) संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून हा सोहळा रविवार दि. ९ जुलै सकाळी ९ वाजता के.बी. सभागृह, सह्याद्री कॉलेज येथे पार पडणार असल्याची माहिती संगमनेर दशनाम गोसावी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलीय.
गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेर दशनाम गोसावी समाज संघटनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच दरवर्षी इयत्ता दहावी व बारावीत उत्कृष्ट गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव केला जातो.
त्याचबरोबर तालुक्यात समाजाच संघटन वाढवून एकजूट करण्यासाठी पदाधिकारी अधिक परिश्रम घेत असतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले असून यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी विविध मान्यवरांसह तालुक्यातील शेकडो समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
