१६ आमदार अपात्रतेचा मुद्दा…, सुप्रीम कोर्टाकडून मोठी अपडेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकर होण्याची शक्यता आहे. याबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर १४ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

ही सुनावणी लवकर व्हावी, यासाठी ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणी दरम्यान काय होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अडीच महिन्यांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिंदे गटातील सोळा आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या आमदारांना अपात्र करण्याबाबत योग्य तो निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र या निर्णयासाठीची वेळ ठरवून देण्यात आलेली नाही.

या याचिकेवर लवकर निर्णय घेण्याची मागणी सुनील प्रभु यांनी केली होती. यासह विधानसभा अध्यक्षांना निलंबनाबाबत निर्देश द्या, अशीही मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे.

Leave a Comment