संगमनेर(DSNews24/किरण पुरी) संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेच्या वतीने तालुक्यातील दहावी व बारावी तसेच नवोदय परिक्षेत उत्कृष्ट गुण मिळवत यश संपादन केलेल्या २० यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित केलेला सोहळा संगमनेर येथील सह्याद्री कॉलेजच्या के.बी. सभागृहात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष श्रीकांत गिरी हे होते तर व्यासपीठावर निबंधक शिवचरण पुरी, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, सामाजिक वनीकरणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सोनाली गिरी, नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी, संग्राम पतसंस्थेचे चेअरमन विजय गिरी, उद्योजक शिवचरण भारती, योगेश गोसावी, ग्रामपंचायत सदस्या सोनाली गिरी आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत शंकराचार्य यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर तालुक्यातील विविध गावांमधील दहावी, बारावी व नवोदय परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या २० विद्यार्थ्यांचा सन्मान पत्र, सन्मानचिन्ह व एक झाड देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी डॉ. सुरेश भारती यांना समाजरत्न तर शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गोसावी यांचा आदर्श सेवा म्हणून गौरविण्यात आले. त्यानंतर मान्यवर व कार्यक्रमास उपस्थित असलेल्या समाज बांधवांचा संगमनेर दशनाम गोसावी समाज संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कै. यशवंत भारती यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण भारती सर व कै. एकनाथ भाऊ भारती यांच्या स्मरणार्थ शिवचरण भारती उद्योजक यांनी विद्यार्थ्यांना ही बक्षीस दिलेत.
यावेळी तालुक्यातील गोसावी समाज एकवटलेले बघायला मिळाले, आगामी काळात तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असे मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अचूक नियोजन करत सोहळा यशस्वीपणे पार पडला.
यावेळी संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेचे अध्यक्ष दशरथ गोसावी, उपाध्यक्ष भागवत भारती, सचिव माधव पुरी, कोषाध्यक्ष सोमनाथ गोसावी, खजिनदार प्रविण गोसावी, कार्याध्यक्ष चंदन गोसावी, सहसचिव संतोष पुरी, सह खजिनदार निखिल गोसावी, संघटक पदमाकर गोसावी, प्रसिद्धी प्रमुख काशिनाथ गोसावी, सह संघटक राजाराम गोसावी, समन्वयक लक्ष्मण भारती, गणेश गोसावी, यमन गोसावी, रंजित गिरी, जालिंदर गोसावी, पत्रकार किरण पुरी, गोरक्ष गोसावी तसेच गोविंद भारती, काशिनाथ गोसावी, बाबासाहेब गोसावी, किशोर गोसावी, चंद्रकांत गिरी, शरद गिरी, सुनिल गोसावी, आशिष गोसावी, सुमित गोसावी, योगेश गोसावी, प्रमोद गोसावी, रविंद्र पुरी, मच्छिंद्र गोसावी, रामनाथ भारती, रविंद्र गिरी, बाळासाहेब गोसावी, चैतन गोसावी, राजेंद्र गोसावी, भूषण गोसावी, सोमेश्वर गोसावी, संदिप गोसावी, मारूती गोसावी, बाळासाहेब गोसावी, उल्हास गोसावी, बाळासाहेब गोसावी, शिवाजी गोसावी, तुकाराम भारती, सोमनाथ गोसावी, सुभाष गोसावी, रमेश गिरी, अर्जुनगिर गोसावी, शिवाजी गोसावी, भास्कर गोसावी, भाऊसाहेब गोसावी, मच्छिंद्र भारती, शांताराम भारती, भास्कर गोसावी असंख्य गोसावी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगमनेर दशनाम गोसावी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष दशरथ गोसावी यांनी केले तर सुत्रसंचलन कोषाध्यक्ष सोमनाथ गोसावी व आभार सहसचिव संतोष पुरी यांनी मानले.
