उत्तर नगर जिल्ह्याची शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे भवितव्य अवलंबून असलेल्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे 60 टक्क्यांवर पोहचला आहे.
11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल रविवारी सायंकाळी पाणीसाठा 6637 दलघफू (60.12 टक्के) झाला होता. कालही पावसाचा जोर टिकून असल्याने पाण्यात वाढ होत आहे.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात बुधवारी पुन्हा पावसास सुरूवात झाली. बुधवारच्या तुलनेत गुरूवारी पाऊस वाढला. पण शुक्रवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.
शनिवारी पावसाचा काहीसा जोर कमी झाला होता. पण रविवारी पुन्हा पाऊस वाढल्याने धरणात पाणी येत आहे. काल सकाळी धरणातील पाणीसाठा 6530 दलघफू (59.15 टक्के) होता. तो सायंकाळी 6637 दलघफू (60.12 टक्के) झाला होता.
