अहमदनगरच्या सावेडी उपनगरातील एकविरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल (15 जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
धारदार शस्त्राने वार केल्याने अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले आहेत. अंकुश चत्तर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भाजपा नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह सात ते आठ जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे.
