शरद पवारांच्या भेटीत काय घडलं, प्रफुल्ल पटेल म्हणाले…..

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी तब्बल आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या नेत्यांनी एक तास शरद पवार यांच्याशी चर्चा केली.

मात्र, या भेटीत शरद पवार यांनी आमच्याशी काहीच भाष्य केलं नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. आम्ही गेल्या गेल्या शरद पवार यांचे पाया पडून आशीर्वाद घेतल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. तसेच ही बैठक पूर्वनियोजित नव्हती, अशी माहितीही त्यांनी दिली.

तब्बल तासभर शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधला. या भेटीत नेमकं काय झालं? शरद पवार यांनी काय सांगितलं? भेट कशी घडली? काय कारण घडलं? याबाबतची माहिती दिली.

मात्र, भेटीची माहिती दिल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तरे देण्यास नकार दिला. तसेच राष्ट्रवादीच्या इतर कोणत्याही नेत्याने या भेटीवर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

आमचे सर्वांचे दैवत, आमचे नेते, आदरणीय शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. वेळ न मागता आम्ही आलो. शरद पवार हे चव्हाण सेंटरला मिटिंग निमित्त आल्याचं कळालं होतं. त्यामुळे संधी साधून आम्ही इथे आलो. पवार साहेबांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले.

सोबत आम्ही सर्वांनी साहेबांना विनंती केली की, आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच. राष्ट्रवादी एकसंघ कसा राहू शकतो यासाठी त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Leave a Comment