नवी दिल्ली : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमन चांडी यांचे आज सकाळी निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेतही दिसले होते.
केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन आणि चांडी यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमन चांडी हे 79 वर्षांचे होते.
ओमान चांडी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून बंगळुरुत उपचार सुरु होते. त्यांच्या मुलाने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. २००४ ते २००६ आणि २०११ ते २०१६ या कालावधीत त्यांनी केरळचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.
ओमान चांडी हे मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. २०१९ पासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना घशाचा आजारही जडला होता. उपचारांसाठी त्यांना जर्मनीतही नेण्यात आले होते.
आता आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास सोशल मीडिया पोस्टद्वारे चांडी यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ओमान चांडी यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मरियम्मा, चांडी ओम्मान आणि मुली मारिया व अचू असा परिवार आहे.
