कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

राहुरी – वांबोरी उपबाजारात गुरूवारी झालेल्या कांदा लिलावात 18 हजार 549 कांदा गोण्याची आवक झाली.

एक नंबरचा गावराण कांदा 1 हजार 305 रुपये ते 1 हजार 700 रुपये, दोन नंबरचा कांदा 805 रुपये ते 1 हजार 300 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 रुपये ते 800 रुपये भावाने विकला गेला.

तसेच गोल्टी कांद्याला 600 रुपये ते 1000 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 34 कांदा गोण्यांना 2 हजार रुपये, 40 कांदा गोण्यांना 1 हजार 900 रुपये तर 73 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment