हवामान खात्याने येत्या २४ तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तसंच या राज्यांना हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, गोवा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे.
या राज्यांना पावसांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व राज्यांमध्ये आजपासून २ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो.
पुढच्या ४ ते ५ दिवसांत पूर्व, ईशान्य आणि पूर्व मध्य भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
