BREKING! पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, नेत्यासह ४४ जण ठार

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे रविवारी जोरदार बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटात 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 150 जण जखमी झाले आहेत. हा बॉम्ब स्फोट खैबर पख्तूनख्वाच्या बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यात झाला आहे.

जमीयत उलेमा इस्लाम फजलच्या (JUIF) रॅलीवेळी हा बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटात JUIFचा प्रमुख मौलाना जियाउल्लाह जान यांचा मृत्यू झाला आहे. या स्फोट अत्यंत शक्तीशाली होता.

स्फोट होताच लोक प्रचंड घाबरले आणि मिळेल तिकडे सैरावैरा धावत होते. त्यामुळे अनेकांना मारही लागल्याचं सांगितलं जातं. मात्र, या स्फोटाने पाकिस्तान पुरता हादरून गेला आहे.

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, जमीयत उलेमा इस्लाम फजलचा नेता मौलाना जियाउल्लाह जान यांचा बॉम्ब स्फोटात मृत्यू झाला आहे. या स्फोटातील जखमींना तात्काळ पेशावर आणि टिमरगेरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ज्या ठिकाणी बॉम्ब स्फोट झाला त्या ठिकाणी तात्काळ मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तसेच घटनास्थळी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. या रुग्णवाहिकांमधून मृतदेह आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात नेले जात होते.

Leave a Comment