शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात पाऊस ब्रेक घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जुलैमधील दमदार हजेरीनंतर ऑगस्टमध्ये मान्सूनचा पाऊस विश्रांती घेण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार ओडिशा जवळील कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगाल जवळ सरकण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ३ ते ९ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये पावासाचा जोर कमी असणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
