काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघाताच्या आठवणी ताज्या असताना समृद्धी महामार्गावर पुन्हा मध्यरात्री मोठा अपघात झाला आहे.
महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी मध्यरात्री शहापूर तालुक्यातील सरलांबेजवळ घडली.
सरळआंबा जवळील समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. यावेळी तयार झालेले सिमेंटचे पुलाचे भाग उचलणारे महाकाय मशीन कोसळले. त्याखाली अनेक कामगार दाबले गेले आहेत. आतापर्यंत १७ पैकी १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
1 जखमीला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात तर 2 जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.
