राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

शिंदे-फडणवीस सरकारने पीक विमा भरण्यासाठीची मुदत येत्या तीन ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या निर्णयामुळं राज्यातील शेतकऱ्यांना आणखी चार दिवस पीकविमा भरण्यासाठीची मुदत मिळाली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठीची अंतिम मुदत आज म्हणजेच ३१ जुलै रोजी संपणार होती. परंतु अर्ज भरताना सतत ऑनलाईन अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांकडून डेडलाईट वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. ३१ जुलै पूर्वी पेरणी पूर्ण होतात त्यामुळे विम्याची मुदत वाढवता येणार नाही, असं कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं.

परंतु आता राज्य सरकारकडून अचानक तीन दिवसांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारकडून केवळ एक रुपयात पीक विमा भरण्याची नवी योजना जारी करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचाही ऑनलाईन फॉर्म शेतकऱ्यांना भरता येतो.

पावसाळा सुरू झाल्यानंतर जूलै महिन्यात राज्यातील सर्वदूर भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळं शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी पूर्ण केलेली आहे. परंतु राज्यातील अनेक शेतकऱ्यांना विविध कारणांमुळं अद्यापही भात लागवड करण्यास उशीर होत असल्याचं चित्र आहे.

त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठीची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारकडून पीक विमा भरण्याची ऑनलाईन मुदत येत्या तीन ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment