कांद्याच्या भावात उसळी….

गत आठवड्यापासून कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. संगमनेरात कांद्याला प्रतिक्विंटल 2300 रुपये तर पारनेरात 2800 रुपयांपर्यंत दर मिळाला.

काल बुधवारी श्रीरामपूर बाजार समितीत 10056 गोणी उन्हाळ कांद्याची आवक झाली. 1 नंबर कांद्याला 1750 ते 2400 रुपयांचा भाव मिळाला. संगमनेर बाजार समिती आवारात उन्हाळ कांद्याची 5299 गोण्या आवक झाली.

त्याला 200 ते 2300 रूपयांचा दर मिळाला तर पारनेरात 14173 कांदा गोणी आवक झाली. 300 ते 2800 रूपयांचा भाव मिळाला. कोपरगावात 12280 कांदा गोणी आवक झाली भाव 400 ते 2001 रूपयांचा दर मिळाला.

Leave a Comment