ब्रेकिंग! महाविकास आघाडीच्या काळातील ‘त्या’ कामांवरील स्थगिती उठवली

महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) कार्यकाळातील विकास कामावरील स्थगिती सरकारने उठवली आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती दिली होती.

या विरोधात मराठवाड्यातील (Marathwada) लोकप्रतिनिधींनी औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) याचिका दाखल केली होती. तर या सर्व कामांवरील स्थगिती उठवत कामे सुरु करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

मात्र, त्यानंतर देखील काहीच हालचाली न झाल्याने खंडपीठात अॅड. संभाजी टोपे यांच्यामार्फत अवमान याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, यावर 10 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र, या सुनावणीच्या आधीच सरकारने या सर्व कामावरील स्थगिती उठवली आहे.

Leave a Comment