पारनेर(DSNews24/किरण पुरी) भारत राष्ट्र समिती पक्ष (बी आर एस) महाराष्ट्रात पाय रोवताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक हिताचे निर्णय तेलंगणामध्ये बी आर एस पक्षाच्या सरकारने घेतल्यामुळे महाराष्ट्रात आता पक्षाचा चांगलाच बोलबाला दिसत आहे. पक्षाची ध्येय धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पक्षाचे समन्वयक सध्या करत आहेत.
पारनेर तालुक्यात सुद्धा पक्षाने चांगल्या पद्धतीने संघटन करण्यास सुरुवात केली आहे. पारनेर तालुका समन्वयक म्हणून सध्या शेतकरी नेते संतोष वाडेकर हे पक्षाचा प्रचार व प्रसार करत आहेत.
तालुक्यात भारत राष्ट्र समिती पक्ष संघटनेमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याची माहिती संतोष वाडेकर यांनी दिली आहे. येत्या बुधवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पारनेर या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहामध्ये बी आर एस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी. नाशिक विभागीय अध्यक्ष भारत राष्ट्र समिती नाना बच्छाव, पुणे विभागीय समन्वयक बी जे देशमुख,पक्षाचे राज्याचे नेते घनश्याम अण्णा शेलार, जिल्हा समन्वयक शरद पवार, श्रीगोंदा तालुका समन्वयक टिळक भोस, शेवगाव तालुका समन्वयक संदिप राजळे हे पक्षाचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील व राज्यातील काही पदाधिकारी आणि पारनेर तालुक्यातील पक्षाचे समन्वयक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तसेच पक्षांमध्ये तालुक्यातील विविध पक्षांमधील व सामाजिक कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत त्यामुळे पक्ष संघटना वाढीसाठी मदत होणार आहे. अशी माहिती यावेळी पारनेर तालुका बीआरएस पक्षाचे समन्वयक संतोष वाडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
