राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देण्यासाठी त्यांनी शरद पवार यांना सोबत घेऊन येण्याची भाजपने अट ठेवल्याचा दावा केला आहे.
त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळत आहे. ही चर्चा सुरू असतानाच प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. समजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलून अजितदादांना मुख्यमंत्री केलं तर भाजपला खूप परिणाम भोगावे लागतील. शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत आले आहेत.
जेव्हा भाजपसोबत कोणीच नव्हतं तेव्हा शिंदे त्यांच्यासोबत आले. त्यांनी मोठी रिस्क घेतली. वर्षभरानंतर त्यांना डावलून अजितदादांना मुख्यमंत्री केलं तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.
बच्चू कडू यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहे. अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास महायुतीत वादाची ठिणगी पडू शकते, असं सांगितलं जात आहे.
