नगरमधील भाजपच्या बड्या नेत्याचा पुतण्या ठाकरे गट……

नगरच्या राजकारण माजी आमदार अनिल राठोड यांच्या रुपाने नगरमध्ये शिवसेनेची ताकद होती. मात्र, त्यांच्यानंतर शिवसेनेची नगरमधील ताकद काहीशी कमी झाली.

त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील १३ खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामध्ये शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडेही त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे ठाकरेंना नगरमध्ये मोठा धक्का बसला होता.

वाकचौरे आणि छल्लारे यांनी काल प्रवेश केला आहे. त्यानंतर आता पाचपुते यांचाही प्रवेश होणार असल्यामुळे आगामी काळात ठाकरे शिवसेनेला नगरच्या राजकारणात चांगले दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे साजन पाचपुते हे पुतणे आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन विरुध्द प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत झाली आणि त्यात साजन यांनी सफाईदार विजय मिळविला. त्यावेळी कुटुंबात वादाची ठिणगी पडली.

Leave a Comment