महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काका-पुतण्यांमधला संघर्ष काही नवा नाही. बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे ते आता शरद पवार-अजित पवार या काका-पुतण्यांमधलं राजकारण महाराष्ट्राने अनेकदा पाहिलं आहे.
गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे या काका-पुतण्यामध्येही वाद झाले. मुंडे यांच्या बीडमध्येच आता पुन्हा एकदा काका-पुतण्याचा संघर्ष समोर आला आहे. बीड जिल्ह्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला.
क्षीरसागर कुटुंबातील आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत आहेत, त्यानंतर आता डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासोबत काही नेत्यांचेही प्रवेश राष्ट्रवादी अजित पवार गटात झाले.
