‘भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना सोडली; पण त्यांनी कधी शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र काही पापी, गद्दार शिवसेना संपवायला निघालेत. या गद्दारांचा शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत,’ असा ठाम विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
‘भाऊसाहेबांनी चूक केली होती; पण पाप केले नव्हते. भाऊसाहेब, माझी माफी मागितली नाही तरी चालेल; पण शिवसैनिकांची माफी मागावी,’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘पक्ष संपविणारा विरोधक पहिल्यांदाच आपण पाहत आहोत. शिवसैनिक चुकीला माफी देतो; पण पापाला माफी देत नाही,’ असेही उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले.
