Seema Deo : मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी निधन झाले आहे.
वृद्धपकाळाने वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्या निधनाने सिनेविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सीमा यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक यशस्वी आणि हिट चित्रपट मराठीसह हिंदी सिनेसृष्टीला दिले आहेत.
एकून ८० चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिलाय. सीमा यांचे पती रमेश देव यांनी देखील मनोरंजन विश्वात उल्लेखनीय कामगीरी केली आहे.
