संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथे १० मार्च रोजी शिवजयंती(Shivjaynti) निमित्त भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंती उत्सव साजरी करण्यासाठी भव्य तयारी करण्यात आले आहे. या निमित्त भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपन्न होणार आहे.
९ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता ज्योत आणण्यासाठी शिवनेरी किल्ल्याकडे प्रस्थान होणार आहे. तसेच १० मार्च रोजी ज्योतीचे आगमन झाल्यावर सकाळी ७ ते ९ या वेळेत साकूर येथून भव्य मिरवणूकीसह मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ७ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
या डान्स स्पर्धेत मोठा व छोटा असे दोन गट पाडले असून मोठ्या गटाला प्रथम बक्षीस ५५५५ रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र दिले जाणार आहेत. तसेच छोट्या गटासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस ५००१ असून दोन्ही गटात ७ नंबर काढून बक्षीसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी नाव नोंदणी सुरू आहे.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी अनेक दानशूर दात्यांनी मदत केली असून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवजयंती उत्सव समिती, समस्त ग्रामस्थ बिरेवाडी व ओम साई गृप बिरेवाडी यांनी केले आहे.
