Rahuri : वळण परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा ; पिकांचे नुकसान

Rahuri : राहुरी तालुक्यातील वळणसह परिसरात वादळी वारा आणि गारपीटीसह अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे.

त्यामुळे परिसरातील हरभरा, गहू, मका, सोयाबीन इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने पळवला अशा भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत.

तसेच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Comment