देशात लोकसभेची तयारी अनेक पक्षांनी सुरु केलेली असताना भाजपने देखील तिसऱ्यांदा पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. अशात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे.
सीएम ममता बॅनर्जी यांनी दावा केला की, भाजप डिसेंबर 2023 मध्येच लोकसभा निवडणूक घेऊ शकते. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने हेलिकॉप्टरही बुक केल्याचे त्यांनी सांगितले. ममता बॅनर्जी यांनी टीएमसी युवा मोर्चाच्या रॅलीत हे वक्तव्य केले.
ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या युवा मोर्चाच्या रॅलीला संबोधित करताना म्हणाल्या की, जर भाजप सलग तिसऱ्यांदा देशात सत्तेवर आला तर देशाला हुकूमशाही राजवटीला सामोरे जावे लागेल.
रॅलीदरम्यान दावा करताना त्या म्हणाल्या की, मला भीती आहे की भाजप डिसेंबर 2023 मध्येच लोकसभा निवडणुका वेळेपूर्वी आयोजित करू शकते.
