राज्यातील बहुतांशी भागात पुढील ४ ते ५ दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना मंगळवार ५ सप्टेंबर ते गुरूवार ७ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान ‘या’ जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र – पुणे, कोल्हापूर आणि सातारा
कोकण – रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
मराठवाडा- लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, जालाना
विदर्भ- अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ
