मोठी खळबळ! राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं परंतु उद्धव ठाकरेंनी….. 

२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. त्याचं कारण होतं मुख्यमंत्रीपद. अमित शाह यांनी आपल्याला अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल शब्द दिला होता, असा दावा उद्धव ठाकरेंना केलेला. त्यानंतरही त्यांनी वारंवार याबद्दल भाष्य केलं.

२०२२ मध्ये पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करुन भाजपसोबत जात सत्तास्थापन केली. त्यामुळे उद्धव ठाकरे गट सत्तेपासून दूर झाला. मात्र महाविकास आघाडीची सत्ता असताना उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद मागितलं होतं, असा नवीनच गौप्यस्फोट आता प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शिवसेनेकडे ५६ आमदारांचं संख्याबळ होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेकडे ५४ आमदार होते. त्यामुळे राष्ट्रवादीला दोन-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो असता ते काहीच बोलले नाहीत.

पटेल म्हणाले की, राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं, यासंदर्भातील चर्चा झाली त्यावेळी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हेदेखील उपस्थित होते. परंतु त्यांनी मौन बाळगलं. राष्ट्रवादीला त्यापूर्वीदेखील संधी आलेली मात्र मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, ही खंत आहे. असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरही आक्षेप नोंदवला.

उद्धव ठाकरे जो मुद्दा उपस्थित करतात तोच मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केल्याने ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल

Leave a Comment