देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते तसेच ठाकरे गटाचे उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप यांचा मुलगा योगेश घोलप यांनी काल मुंबई येथे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली.
त्यामुळे नाशिक मध्ये ठाकरे गटात खळबळ उडाली असून योगेश घोलप हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
मात्र ही केवळ सदिच्छा भेट होती अशी माहिती योगेश घोलप यांनी दिली आहे. तर दुसरीकडे बबनराव घोलप समर्थकांनी काल शिवतीर्थावर शक्तीप्रदर्शन केले यावेळी त्यांनी घोलप यांना शिर्डीची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली
