नव्या संसद भवनाच्या इमारतीचा दि. १९ सप्टेंबरपासून श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी अजित पवार गटातील खासदार प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांनी नवी दिल्ली येथे भेट घेतली.
या भेटीचे फोटो प्रफुल्ल पटेलांनी सोशल मिडीयावर शेअर केले. त्यानंतर चर्चांणा उधाण आले आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर प्रफुल्ल पटेल अजित पवार गटात सहभागी झाले आहेत.
त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये प्रफुल्ल पटेलांनी लिहले आहे की, “नवीन संसद भवनातील ऊर्जा दिवस! राज्यसभेचं चेंबर हे एक चमत्कार आहे. हा क्षण आदरणीय शरद पवार साहेबांसोबत शेअर केल्याने तो आणखीनच खास बनला. कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि सौहार्दाचा आस्वाद घेतला…”, असे पटेल म्हणाले.
