संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथे गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश मंडळाकडून मिरवणूक काढण्यात आली असून गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. मिरवणूकी दरम्यान पावसाने देखील हजेरी लावली आहे. साकूर सह परिसरात अनेक गणेश मंडळ आहे. सर्व मंडळाच्या गणपतीची विसर्जनासाठी मिरवणूक काढली आहे. मिरवणुकीत महिलांनी लेझीम नृत्य सादर केले.
