भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मत व्यक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका ‘हिंदी’ वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सविस्तर भूमिका मांडली.
अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा वारंवार समोर येत असते. अखेर या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
“एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्त्वात लढू. राज्यात सीएम बदलणार नाहीत. अजित पवारांना बनवायची वेळ आली तर त्यांना 5 वर्षांसाठी बनवू”, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
