पुण्यात दुचाकीच्या शोरुमला भीषण आग 

पुणे शहरातील आगीचे सत्र सुरुच आहे. एक, दोन महिन्याच्या कालावधीत पुणे शहरात भीषण आगीच्या घटना घडत आहेत. आता गुरुवारी सकाळी सिंहगड रस्त्यावर असणाऱ्या एका दुचाकीच्या शोरुमला आग लागली.

या आगीत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ही आग शार्ट सर्कीटमुळे लागल्याची शक्यता आहे.

पुणे शहरातील सिंहगड रोडवर नवशा मारुती मंदिरामागे दुचाकीचे शोरुम आहे. टिव्हीएस कंपनीचे हे शोरुम आहे. या ठिकाणी सकाळी 7.45 मिनिटांनी आग लागली.

आगीची माहिती मिळताच पुणे मनपाच्या अग्निशमन दलाची 5 वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्नीशमन दलाने दीड, दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

परंतु तोपर्यंत सर्व्हिस सेंटरमधील 20 ते 25 दुचाकी जळाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Leave a Comment