महाराष्ट्रातील ‘या’ गावात सर्वच शेतकरी दूध व्यवसाय करून कमवातात लाखोंचा नफा

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बोरगडी हे गाव सध्या चर्चेत आहे. वास्तविक हे संपूर्ण गाव दूध व्यवसाय (Dairy Business) करून चांगला नफा कमावत आहे. 20 वर्षांपूर्वी शेतकरी हणमंतू गोपुवाड यांनी एक म्हैस खरेदी करून दुधाचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू संपूर्ण गाव दूध व्यवसायाकडे वळले आहे.

वार्षिक नफा एक लाख रुपयांपर्यंत

हणमंतू गोपुवाड यांच्याकडे आज 10 म्हशी आहेत. त्यापैकी 6 म्हशी दूध देत आहेत. या म्हशी सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळा 50 लिटर दूध देतात. या दुधाची किंमत 60 रुपये प्रतिलिटर आहे. ते गावाजवळील हिमायतनगर शहरात नेऊन विकतात. यातून त्यांना दररोज 2500 ते 3000 रुपये उत्पन्न मिळते.

खर्च वजा केल्यावर त्यांना दरमहा सुमारे एक लाख रुपयांचा नफा मिळतो. या दूध व्यवसायातून त्यांनी 5 एकर जमीनही खरेदी केली आहे. हनुमंतू गोपुवाड यांनी प्रत्येक शेतकऱ्याने गाई पालन हा साईड बिझनेस म्हणून करावा, असा सल्ला दिला आहे.

संपूर्ण गावाने दुधाचा व्यवसाय केला

हनुमंतू गोपुवाड हे दुसऱ्याच्या शेतात पहारेकरी म्हणून काम करत असताना गावात म्हैस घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर गावातील अनेकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दूध व्यवसाय सुरू केला. नफा पाहून येथील तरुण शेतकरीही दूध व्यवसायाकडे वळू लागले आहेत. त्यामुळे त्यांना नोकरीसाठी घराबाहेर भटकावे लागत नाही.

Leave a Comment