राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अत्यंत मोठा दावा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
अजित पवारांकडे गेलेल्या आमदारासोबत माझी चर्चा झाली. त्यांनी मला त्यांची भूमिका सांगितली आहे. ते म्हणाले की, आम्ही मनापासून आम्ही शरद पवारांसोबत आहोत.
आता थोडा दबाव आहे म्हणून आम्ही इकडे राहतोय. पण आतून आम्ही पवारसाहेबांसोबतच आहोत. जे दिसतं तसं नाही. खरी परिस्थिती वेगळी आहे. ते लोक आमच्यासोबत आहेत, असं जयंत पाटील म्हणालेत. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
