अजितदादांना मतदान करू नका, तरूणाचं आवाहन 

70 लाख कोटी वाचवण्यासाठी अजित दादा (Ajit Pawar) तुम्ही भाजपसोबत गेलात आम्ही कोणाकडे जायचं? आधी आम्हाला फडणवीस खोटे वाटायचे पण आता फडणवीस खरे वाटतात तुम्ही आम्हाला खोटे वाटतात, असं म्हणत विजय भोसले या तरुणाने अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवार यांना मतदान करु ना, असं आवाहन तरुणांनी केलं आहे.

बारामती तालुक्यातील तरडोली येथील शेतकरी सागर जाधव हा दुधाला दर मिळावा यासाठी उपोषणाला बसला आहे. आजचा त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे. ग्रामस्थांच्या वतीने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली पुणे बारामती रस्ता रोको करण्यात येणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर हा तरुण बोलत होता. तसेच अजित पवारांना मतदार करू नये, असं आवाहन या तरुणाने नागरिकांना केलं आहे. या रास्ता रोको दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दुधाला चाळीस रुपये दर मिळावा, या मागणीसाठी सरकारकडं मागणी करत आहे. मात्र सरकार लक्ष देत नसल्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली पुणे बारामती रस्ता आढळून धरत रास्ता रोको केला.

यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच दूध रस्त्यावर उतरुन जोपर्यंत चाळीस रुपये दर दुधाला मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे सागर जाधव यांनी स्पष्ट केलेले आहे.

Leave a Comment