दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, शिक्षण मंडळान घेतला मोठा निर्णय 

SSC HSC Exam : दहावी आणि बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचं लक्ष वेधणारा निर्णय नुकताच राज्यातील शिक्षण मंडळानं घेतला आहे.

ज्याचा थेट परिणाम भविष्यातील परीक्षांवर होताना दिसणार आहे. दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे.

जून- जुलै च्या पुरवणी परीक्षेपासून दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात ही दहा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. परिणामी पुढील वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुल्क वाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे याची पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

वाढीव दरानुसार आता इयत्ता दहावीसाठी 440 रुपये तर, बारावीच्या परीक्षेसाठी 550 रुपये इतकं शुल्क भरावं लागणार आहे. राज्य शिक्षण मंडळानं 2017 नंतर परीक्षा शुल्कामध्ये कोणतीही वाढ केली नव्हती.

पण, दरम्यानच्या काळात शिक्षण मंडळाच्या खर्चात वाढ झाल्यामुळं होणारा तोटा नियंत्रणात आणण्यासाठी शुल्कवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

Leave a Comment