मुंबई : यंदाही शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसऱ्याच्या (Dasara Melava) मुहूर्तावर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. ठाकरे गटाला मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या (BMC) जी उत्तर विभागानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? हा प्रश्न निकाला निघाला आहे. 24 ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.
शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा हा वाद अखेर मिटला आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवागनी मिळाली आहे. मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला ही परवागनी दिली.
त्यानुसार ठाकरे गटाचा दसरा मेळावा 24 ऑक्टोबरला शिवतीर्थवर होणार आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी दुसरीकडे घेण्याचे संकेत दिले होते.
त्यानुसार शिंदे गटाने शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला होता. अखेर आज महापालिकेने शिवसेना ठाकरे गटाला परवानगी दिली.
