BIG NEWS! अर्थसंकल्पात ‘या’ रेशनकार्ड धारकांसाठी मोठी घोषणा

उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करत असतांना महिलांच्यासाठी विविध घोषणा केल्या आहे. यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या ओवीचा देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भ देऊन जन्मला येणाऱ्या मुलीसाठी मोठी घोषणा केली आहे.

मुलींच्या सक्षमीकरण याकरिता लेक लाडकी ही नवी घोषणा जाहीर केली आहे. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक असलेल्या कुटुंबात मुलगी जन्मला आल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

मुलगी जन्मला आल्यानंतर तिच्या नावावर सरकार पाच हजार रुपये देणार आहे. तर चौथीत गेल्यानंतर चार हजार रुपये, सहावीत सहा हजार रुपये, अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

याशिवाय लाभार्थी मुलीचे वय अठरा झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये तिला रोख देण्यात येईल अशी मोठी घोषणा शिंदे – फडणवीस सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Comment