महायुतीत पुढचा मुख्यमंत्री कोण असणार यावरून सुप्त संघर्ष सुरू असतानाच आता महाविकास आघाडीतही मुख्यमंत्री पदावरून दावेदारी सुरू झाली आहे.
2024 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा कॉंग्रेस पक्षाचाच असेल असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
महाविकास आघाडीत कॉंग्रेसच मोठा भाऊ आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कॉंग्रेस पक्षाचाच असेल असा दावा वडेट्टीवारांनी केला आहे.
त्यासोबतच भाजपने फोडाफोडीचा प्रयत्न करून देखील कॉंग्रेस पक्ष फुटला नाही, असे म्हणत वडेट्टीवारांनी अप्रत्यक्षरीत्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. तर वडेट्टीवारांच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीत दावेदारीवरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
