बिग ब्रेकिंग! शिंदे गटाला मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

विधानसभा निवडणुकीला वर्ष बाकी असताना नेत्यांच्या पक्षबदलीला सुरुवात झाल्याची चित्र आहे. एकीकडे शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असताना, आता शिंदे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग बरोरा गुरुवारी 19 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

कोण आहेत पांडुरंग बरोरा?

पांडुरंग बरोरा हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते विधानसभेवर गेले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. 1980 पासून पवार कुटुंबासोबत असलेल्या शहापूरमधील बरोरा कुटुंबाने पक्षासोबत फारकत घेतली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला होता.

त्यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बरोरा यांची जवळीक होती. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

Leave a Comment