अजित पवार गटातील अनेक आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. अनेकांना परत पक्षात यायचं आहे. त्यामुळे त्याबाबत विचार सुरु आहे. अंतिम निर्णय शरद पवार हेच घेतील, असं पाटील म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘खोलात जाऊन त्यांना अडचणीत आणणं मला योग्य वाटत नाही. आज त्यांची अडचण होऊ नये, त्यांची कामे होणे आवश्यक आहे. योग्यवेळ पाहू आणि काय ते जाहीर करु.’ जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
आमदारांना पुन्हा पक्षात घ्यायचं किंवा नाही याबाबत काय निर्णय घेतला जाईल, याबाबत जयंत पाटील यांना विचारण्यात आलं होतं. यावर ते म्हणाले की ‘अंतिम निर्णय राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हेच घेतील.
15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांची पुन्हा येण्याची इच्छा आहे.पण, अंतिम निर्णय शरद पवार घेतील. आताच बोलून त्यांना अडचणीत आणणार वाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. शिरुर आणि बारामतीमध्ये खूप काम करायचं आहे, असंही ते म्हणाले.
