पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण(LCB) विभाग पथकाने मोटार सायकल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या दोन म्होरक्यांसह एकूण ९ सदस्य जेरबंद करत १० लाख रूपयांच्या २९ मोटार सायकली हस्तगत केल्या असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
अमोल नवनाथ मधे (रा. वाघवाडी पोखरी ता पारनेर जि अहमदनगर) विजय संजय मधे (रा. निमदरी ता पारनेर जि अहमदनग), संतोष उमेश मधे (रा. केळेवाडी पोखरी पवळदरा ता. पारनेर जि अहमदनगर), संदिप सुभाष मधे(रा. केळेवाडी, कातळमाळ ता संगमनेर, जि अहमदनगर), विकास साहेबराव मधे ( रा. पवळदरा मधेवस्ती पोखरी ता पारनेर जि अहमदनगर), विजय विठ्ठल जाधव (रा. कुरकुंडी ता संगमनेर जि अहमदनगर), सुनील वामन मेंगाळ (रा. धरणमळई वाडी बोटा ता संगमनेर), भारत पोपट मेंगाळ (रा. गारोळे पठार ता संगमनेर जि. अ नगर), मयुर गंगाराम मेंगाळ (रा आंबीदुमाला ता संगमनेर जि अ नगर )अशी स्थानिक गुन्हे अन्वेशण पथकाने ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात मागील वर्षभरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. ही बाब गांभीर्याने घेवून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोटार सायकल चोरीबाबत कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. जुन्नर विभाग स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक महादेव शेलार, हवालदार दिपक साबळे, नाईक संदिप वारे, जवान अक्षय नवले या पथकाला मोटार सायकल चोरी करणारे आंतरजिल्हा टोळीची गोपनीय माहिती मिळाली.
त्या माहितीचे आधारे कारवाई सुरू केली असता, कारवाईची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात येताच आणखी एक पथक तयार करण्यात आले. दोन्ही तपास पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील आंतरजिल्हा टोळीच्या मुख्य दोन म्होरक्यांसह नऊ जणांना जांबुत फाटा परीसरातून ताब्यात घेतले. यातील काही आरोपीना नारायणगाव तर काहींना ओतूर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेले असून आरोपींकडून नारायणगाव पोलीस स्टेशन ४, घोडेगाव ५,ओतूर ३, जुन्नर ३, मंचर २, खेड २, रांजणगाव १, शिरूर १, अकोले २, आश्वी १, लोणी १, टोकावडे १ असे एकूण २६ गुन्हे उघडकीस आले.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक निरिक्षक महादेव शेलार, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहाय्यक उपनिरीक्षक तुषार पंदारे, हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, मंगेश थिगळे, राजू मोमीण, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, नाईक संदिप वारे, जवान अक्षय नवले, सहाय्यक उपनिरीक्षक मुकुंद कदम, अक्षय सुपे यांनी केली आहे
