Eknath Khadse : एकनाथ खडसे यांच्यावर राष्ट्रवादीन सोपवली मोठी जबाबदारी

Eknath Khadse : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी नियुक्तीचं पत्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र देण्यात आले होते. आता त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खडसे (Eknath Khadse ) यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. खडसे यांच्या नियुक्ती करत राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment