संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील साईबाबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत गेल्या सहा वर्षापुर्वी कोट्यावधी रुपयांचा अपहार झाल्याच उघडकीस आले होते. त्यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली होती.
दरम्यान सहा वर्षांनंतर अहमदनगर जिल्हा तक्रार निवारण आयोगाने ठेवीदारांच्या बाजूने निकाल देत तक्रारदार ठेवीदारांना ३० दिवसांच्या आत ठेवी व्याजासह संचालक मंडळाने देण्याचे आदेश दिले होते. सदर मुदत संपायला ५ दिवस बाकी आहे. त्यामुळे तक्रारदार ठेवीदार भिमराज जाधव व विकास पवार यांनी पुढच पाऊल उचलले आहे.
संचालक मंडळ जिल्हा तक्रार निवारण आयोगाच्या निकालाला आव्हान देण्याची शक्यता असल्याने त्याआधीच तक्रारदार ठेवीदार भिमराज जाधव व विकास पवार यांनी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कॅव्हेट दाखल केले असल्याची माहिती त्यांनी दिलीय.
तसेच जिल्हा तक्रार आयोगाने संचालकांना दिलेली ३० दिवसांची मुदत संपायला ५ दिवस बाकी असून तक्रारदार ठेवीदारांनी पुढील कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
