मोठी बातमी! ट्रक, ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात भीषण अपघात, ३ जागीच ठार 

नंदुरबारमधून एक दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात ट्रक, ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात तिहेरी अपघात झाला.

या अपघातात दोन महिलांसह एक पुरूषाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार जिल्ह्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात ट्रक, मोटरसायकल व ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील 1 पुरुष व 2 महिलांचा जागीच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवरील तिघेही नवापूर तालुक्यातील वाटवी गावचे असून ते साक्री तालुक्यात शेतीच्या कामानिमित्त गेले होते. अपघातातील ट्रकचा ब्रेकफेल झाल्याने तो अनियंत्रित झाला. या ट्रकने आधी दुचाकीला आणि नंतर ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, मोटरसायकल १०० मीटर फरफटत केली. यामध्ये गाडीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

या ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरवरील चालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे. सध्या त्याच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Leave a Comment