महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची राजकारणातून निवृत्ती?

महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी थेट राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतोय, असं थेट म्हटलेलं नाही. पण यापुढे आपण एकही निवडणूक लढवणार नाही, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

तसेच पक्षाचं संघटनेचं काम आपण करत राहू, असं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलंय.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबतची महत्त्वाची घोषणा केली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी राजकीय निवृत्तीच्या चर्चांवर स्पष्टीकरणही दिलं आहे. “मी निवडणुकांमधून निवृत्ती घेतोय.

मात्र पक्षाचे काम करतच राहणार आहे”, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. “मी 83 वर्षांचा झालोय. त्यामुळे पूर्वीसारखी धावपळ करणे होत नाही. मी निवडणुकांमधून निवृत्ती घेतोय. मात्र पक्ष संघटनेचे काम मी करतच राहणार आहे”, अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीय.

Leave a Comment